शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी

Image Source : Internet

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर प्रसारित करणे अभिनेत्री केतकी चितळेला भोवलं आहे. कारण, आता या प्रकरणी केतकीला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे.

Image Source : Internet

केतकी चितळेने केलेल्या पोस्टवरुन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला

Image Source : Internet

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंपासून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही अशाप्रकारच्या आक्षेपार्ह भाषेच्या वापराला विरोध केला आहे.

Image Source : Internet

केतकीला सकाळीच सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर, या आक्षेपार्ह पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती.

Image Source : Internet

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी केतकी चितळे विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केलेली आहे.

Image Source : Internet

काल नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना केतकीच्या अंगावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक देखील केली होती.

Image Source : Internet

शरद पवार यांचे दिसणे, आजारपण आणि आवाज यावर पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्यावर आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Image Source : Internet

या पोस्टमध्ये शरद पवारांवर "नरक वाट पाहत आहे" आणि "तुम्ही ब्राह्मणांचा तिरस्कार करता" अशा निंदनीय टिप्पण्या होत्या.

Image Source : Internet