“माझ्यात आणि दिघे साहेबांमध्ये…”धर्मवीरचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडल्यानंतर सलमान खानने याबाबत प्रतिक्रिया दिली.

ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे.

प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नुकतंच ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.

त्यासोबतच अभिनेता सलमान खान, रितेश देशमुख यासारखे दिग्गज कलाकारही यावेळी उपस्थित होते.

dharmveer

सलमान खानची प्रतिक्रिया होती कि  - दिघे साहेब आणि माझ्यात अनेक साम्य होती  त्यातील एक म्हणजे ते एका बेडरुममध्ये राहायचे आणि मी देखील एकाच बेडरुममध्ये राहतो.

“माझ्यात आणि दिघे साहेबांमध्ये दुसरं साम्य म्हणजे त्यांचेही लग्न झालेले नव्हते आणि माझेही झालेले नाही.” असे तो म्हणाला.

“दिघे साहेबांचे गुण दाखवण्यासाठी एक चित्रपट अपुरा, दुसऱ्या भागाची तयारी सुरु”; प्रसाद ओकने दिली माहिती