Shivaji Maharaj

Detailed Shivrajyabhishek 2021 information in Marathi

जय शिवराय मित्रांनू,Shivrajyabhishek sohala विषयी बोलणार आहोत. शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला Shivrajyabhishek असे म्हणतात. Shivrajyabhishek sohala हा भारतामध्ये कोणत्याही राज्याचा पहिला rajyabhishek sohal होता.

शिवराज्याभिषेक सोहळा विषयी थोडक्यात माहिती

आपल्या सर्व मराठी जनतेने राजे, Chatrapati Shivaji Maharaj यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी प्रमाणे सन २०२१ मध्ये पण पर पडणार आहे.

मात्र या पोस्ट मध्ये मी आपल्याला Shivrajyabhishek विषयी Shivaji Maharaj च्या विषयी अधिक माहिती देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती दुर्ग दुर्गेश्वर रायगड किल्ल्यावर साजरी केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराज्यांचा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी साजरा केला होता.भारताच्या इतिहास मध्ये कोणत्याही राज्याचा इतका मोठा राज्याभिषेक सोहळा पार नाही पडला तितका शिवाजी महाराज्यांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला होता.

शिवराज्याभिषेक सोहळा करण्यासाठी शिवरायांनी देशभरातून ब्राम्हणांना आमंत्रित केल होत. त्यावेळी ब्राम्हणांना माहिती नव्हते कि, राज्याभिषेक सोहळा कसा करावा?

शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी त्यावेळी रायगडावर जवळपास लाख लोक जमा झाले होते. आपला लाडका राजा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे पहिले राजे होणार हे पाहण्यासाठी.

शिवराज्याभिषेक सोहळा पार पडण्या अगोदर रायगड किल्ल्यावरती जवळपास ४ महिने तयारी करण्यात येत होती.

शिवराज्याभिषेक सोहळा चालू होण्या अगोदर शिवाजी महाराज्यांनी जिजामातांचा आशिर्वाद घेतला त्यानंतर त्यांनी रायगडावर असणाऱ्या सर्व देवी देवतांचे आशिर्वाद घेतले.

Chatrapati Shivaji Maharaj तुळजापूर मध्ये देवी तुळजाभवानीच्या दर्शनसाठी जाऊ शकले नाहीत परंतु ते प्रतापगडावरती देवी भवानीमातेच्या आशिर्वादासाठी गेले होते.त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली.

Shivrajyabhishek Day (शिवराज्याभिषेक दिवस)

६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक सोहळा झाला. या दिवशी पहाटे shivaji maharaj उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू करण्यात आला होता.

शिवाजी महाराज्यांनी त्या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान केले होते.गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते.दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते.

अष्ठप्रधान मंडळ गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांवर अभिषेक केला गेला.

यानंतर शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

राज्याभिषेक दालन

राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.

छत्रपती शिवाजी महाराज राज सिंहासनावरती अरूढ झाले. जनतेचा वाली लाडका राजा शिवछत्रपती सिंहासनावर अरूढ होता जनता जयजयकार करू लागली.”छत्रपती शिवाजी महाराज कि जय “.

सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला.तोफा डागल्या गेल्या आणि संपूर्ण रयतेला कळले कि आपला लाडका शिवाजी राजा आता छत्रपती झाला.

समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले.इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते.

रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज्यांनी आपल्या मूठ भर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य बनवायचे धोरण बनवले होते आणि ते धोरण शिवाजी महाराज्यानी आणि त्यांच्या मावळ्यांनी सन 1774 ला पुर्ण केले.

जेव्हा शिवराय राजे बनले तेव्हा त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्या ज्या मावळ्यांनी सहकार्य केले. ज्यांनी ज्यांनी आपले प्राण वेचले त्यांची नक्कीच आठवणं आली असेल.

admin

अलीकडील पोस्ट

Penny Stocks List May 2022

आज बहुतेक आशियाई बाजार घसरणीसह व्यवहार करत आहेत. प्रचंड महागाई आणि चीनमधील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे…

5 days ago

Shivam Dube Biography in Marathi, Age, Height, Wife, Children, Family, Facts, Wiki & More

शिवम दुबे यांचा जन्म 26-06-1993 रोजी महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे झाला. तो एक भारतीय क्रिकेट…

1 week ago

Mukesh Choudhary Biography in Marathi, Age, Girlfriend, Wiki, Height, Caste, Net Worth

मुकेश चौधरी हा एक क्रिकेट खेळाडू आहे जो क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. तो डावखुरा वेगवान…

1 week ago

Pravin Tambe Biography In Marathi, Age, Wife, Career, Children

चित्रपट उद्योगाची सध्याची पिढी पूर्णपणे लोकांबद्दलच्या वास्तविक कथांवर आणि प्रेरणादायी किंवा अवास्तव पण सत्य घटनांवर…

1 week ago

How to Open a Demat account in Marathi

डिमॅट खाते कसे उघडावे? Demat Account Kase Kadhave? इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते असणे…

1 week ago

MPSC Stenographer Recruitment 2022: Apply Online @mpsc.gov.in

महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा MPSC 253 लघुलेखकांची (Stenographer ) नियुक्ती करत आहे. उमेदवार 12 मे…

2 weeks ago