नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही संत संकादिक अभंग आरती साठी कडवे शोधत होता तर या ब्लॉग मध्ये आपल्याला मिळेल.
संत सनकादिक भक्त मिळाले आरती
संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥
स्वानंदे गर्जती पाहुं आले कौतुक ॥ १ ॥
नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥
स्वर्गीहूनि सुरवर पाहुं येताति भावा ॥ धृ. ॥
नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥
ओवाळितां श्रीमुख धनी न पुरे मना ॥ २ ॥
एका जनार्दनी मंगल कौतुकें गाती ॥
मंगल आरत्या गाती मिळाले वैष्णव जयजयकारे गर्जती ॥ ३ ॥