नमस्कार मित्रानो, ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा या गाण्याचे बोल शोधत असाल तर या पोस्ट मध्ये आपल्याला विठ्ठल भक्ती गाण्याचे लिरिक मिळतील.
ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा ।
राईरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ।। धृ ।।
कनकाचे पर्येळी उजळोनी आरती ।
रत्नदीपशोभा कैशा प्रकाशल्या ज्योती ।। ओवाळूं || १ ||
मंडित चतुर्भुज कानीं शोभत कुंडले ।
श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ।। ओवाळूं । २॥
वैजयंती माळ गळा शोभे स्यमंत ।
शङ्खचक्रगदापद्म आयुधें शोभत ।। ओवाळूं ।। ३ ॥
सांवळा सुंदर जैसा कर्दळीचा गाभा ।
चरणीईंचीं नूपुरें वांक्या गाजती नभा ।। ओवाळूं ।। ४ ।।
ओवाळीता मन माझें ठाकलें ठायी ।
समाधिस्थसमान तुकया लागला पायी ।। ओवाळूं ||५||