Famous Lion and Mouse Marathi Story

Sinh Ani Undir Marathi Goshti | Lion and Mouse Marathi Story | Lion and Mouse Marathi Story | सिंह आणि उंदीर बोधकथा

या post मध्ये आज मी आपल्याला Lion and Mouse Marathi Story Moral Stories in Marathi. सिंह आणि उंदिराची ही गोष्ट अतिशय लोकप्रिय आहे.

जर तुम्ही आपल्या मुलासाठी मराठी मध्ये गोष्ट शोधत असाल तर तुम्ही योग्य पोस्ट वर पोहोचला आहात. लहान मुलांना विविध गोष्टी ऐकायला फार मजा वाटते त्या करीता मी कायम या website वरती Marathi Goshti Post करत असतो.

Lion and Mouse Marathi Story Goshti Moral Stories in Marathi
जंगलात एकदा एक सिंह एका झाडाखाली झोपला होता. तेव्हा तिथून एक उंदीर जात होता आणि उंदराच्या मनात आल की आपण या सिंहाची कळ काढुया म्हणून तो उंदीर फक्त मस्तीसाठी त्या सिंहाच्या शरीरावर उड्या मारू लागला खेळु लागला, चालू लागला.
यामुळे सिंहाची झोप मोडली सिंह अस्वस्थ झाला आणि तो त्या उंदरावर रागावला.
सिंह उठला आणि त्या उंदराला म्हणाला “उंदरा तू एका शांत झोपलेल्या सिंहाला उठवलास तुला आता मी सोडणार नाही मी तुला खाऊन टाकणार”.
J
हे ऐकून उंदीर खूप घाबरला तो सिंहाकडे गयावया करू लागला.
“हे मित्रा तू सिंह आहेस तू या जंगलाचा राजा आहेस. मी एक छोटासा उंदीर आहे.मला जाताना तू दिसला मग वाटल तुला जरा सतवाव
 म्हणून मी खोड काढली माफी असावी म्हणू लागला मला सोडून द्या,आता जर का तुम्ही मला सोडलं तर मी पुढे जाऊन तुमची मदत नक्कीच करेन”.सिंह उंदराचे सगळे बोलणे ऐकतो आणि त्याला सोडून देतो.
एकदा जंगलामध्ये शिकारी करिता काही लोक आले होते त्या लोकांनी सिंहाला पकडले होते आणि त्यांच्या जाळ्यात घालून ठेवले होते. आणि त्या वेळीच तिथून तोच उंदीर जात असतो.उंदराला समजलेलं असत की हा सिंह तोच आहे ज्याने त्या दिवशी आपल्याला सोडून दिलं होत.
आत्ता हाच आपला मित्र संकटात आहे त्याची आपण मदत केली पाहिजे म्हणतो आणि तो त्या आपल्या टोकदार दातांनी ते जाळ कुडतरून टाकतो आणि सिंहाला मोकळं करतो. उंदीर आणि सिंह मग जंगलात धूम ठोकतात.
गोष्टीतील बोध | उद्देश्य :
दयाळू पणाने जर आपण कोणाची मदत केेली तर तोही संकटसमयी आपली मदत करतो.जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे.

1 thought on “Famous Lion and Mouse Marathi Story”

Leave a Comment

x
error: Content is protected !!