Jai Jai Tryambakraj Girijanacha Aarti Lyrics

जर तुम्ही श्री शंकराची जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो आरतीचे कडवे शोधत आहत तर आमच्या वेबसाइट वरती आपल्याला मिळेल.

शंकर/ महादेव आरती ( जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ) कडवे मराठी मध्ये

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ॥
त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ॥
वृषभारूढ फणिभुषण दशभुज पंचानन शंकरा हो ॥
विभूतिमाला जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥ ध्रु० ॥
पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरीं हो ॥
त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ॥
प्रसन्न हो‍उनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ॥
औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय० ॥ १ ॥
धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णूं किती हो ।
आणिकही बहु तीर्थें गंगाद्वारादिक पर्वतीं हो ॥
वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो ॥
तुझिया दर्शनमात्रें प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ जय० ॥ २ ॥
ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ॥
तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणीं रुपती खडे हो ॥
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्यांचें झडे हो ॥
केवळ तो शिवरूप काळ त्याच्या पायां पडे हो ॥ जय० ॥ ३ ॥
लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो ॥
संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो ॥
शिव शिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो ॥
गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ जय जय० ॥ ४ ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *