नमस्कार मित्रानो, जर तुम्ही भगवान हनुमानाची आरती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट वरती तुम्हाला हनुमानाची आरती भेटेल. त्याच प्रमाणे जर तुम्हाला ही आरती कशी म्हणावी माहिती नसेल तर खालील व्हिडिओ मध्ये पाहून म्हणू देखील शकता.
हनुमंताची आरती सत्राणे उड्डाणे
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।।
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।।
दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।।
थरथरिला धरणीधर मानीला खेद ।।
कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ।।
रामी रामदासा शक्तपचा शोध ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।। २ ||