नमस्कार मित्रानो, जर तुम्ही गणेश प्रार्थना Lyrics शोधत असाल तर या Website वरती आपल्याला मिळतील.
Ganesh Prarthana Lyrics in Marathi
गणेश प्रार्थना –
तुज मागतो मी आतां ।
मज द्यावे एकदंता ।।
तुझे ठायी माझी भक्ति ।
विरुढावी गणपति ।।
तुझे ठायी ज्याची प्रीती ।
त्याची घडावी संगति ।।
धरणीधरा ऐसे द्यावे ।
सर्वांभूती लीन व्हावें ।।
तुज शरण शरण ।
आलो पतित मी जाण ।।
तुझा अपराधी मी खरा ।
आहे इक्शुचापधरा ।
माझी येउदे करुना ।
तुजलागी गजानना ।।
नाम घ्यारे मोरयाचे ।
तरी सार्थक जीवांचे ।।
कलियुगी नामाविण ।
अन्य उपाय नसे जाण ।।
नामे बहुत तरले ।
पुन: जन्मासी न आले ।।
धरणीधरा मज द्यावे ।
नित्य नामची वदवावे ।।