Dr.Swagat Todkar information in marathi (स्वागत तोडकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती )
नमस्कार मित्रानो,तुम्हाला अनेकदा आपल्या आरोग्यविषयी काहींना काही तक्रार होत असते कि, ताप येत आहे किंवा सर्दी होते ती कधी कमी होत नाही. किंवा खोकला लागलेला असतो परंतु कमी होत नाही आहे. अश्या वेळी आपण डॉक्टरकडे जातो किंवा एखादा मोठा आजार असेल तर तुम्हाला ऑपेरेशन सुद्धा कराव लागत अश्या वेळी तुम्हाला काही विलाज उरत नाही, एकंदरीत काय तुमच्याकडे पर्याय उरत नाही तुम्ही विचार करत असता कि मला हे करायचं नाही आहे तरीपण आपला जीव वाचवायला कराव लागणार.पण या सर्व गोष्टी व्हायच्या अगोदर जर आपण खबरदारी घेतली तर कि बाबा आपल्याला हे व्हायचं नाही तर आपल्याला हे करायच आहे. आपल्याला सुरक्षित राहायचं आहे,पण आपल्याला विलाज माहिती नसतात कि काय केल्यानं काय होईल त्यासाठी म्हणून आपण डॉक्टर कडे जात असतो आणि ते आपल्याला भरपूर गोळ्या लिहून देतात ज्या तुम्हाला दिवसरात्र, वर्षानुवर्षे खावी लागतात.पण यावर उपाय म्हणून काय करता येईल कोण आहे का डॉक्टर जो बिना गोळया इंजेक्शन शिवाय आजार बरा करेल??तर याचे उत्तर आहे होय…. आहे एक डॉक्टर !!
डॉ. स्वागत तोडकर यांचे काम :-
त्यांचे नाव आहे डॉ. स्वागत तोडकर,डॉक्टर स्वागत तोडकर हे कोल्हापूर मधील फार प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि ते आयुर्वेदाच्या मदतीने तुम्हांला तुमच्या विविध आजारांवर मात करायला शिकवतात.त्याचप्रमाणेे सांगायची बाब अशी की जवळपास त्यांना 22 पुरस्काार मिळाले आहेत. त्यांचे कोल्हापूर मध्ये “तोडकर संजीवनी निसर्गोपचार सेंटर” नावाचे क्लीनिक आहे. त्याचाा पत्ता पुढील प्रमाणे आहेन्यू महाद्वार रोड, सिद्धला गार्डन समोर, शिवाजी पेठा वार्ड, एस वॉर्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र 416012त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही उपचार घेऊ शकता.तसेच youtube वर अनेक video सुद्धा उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्ही त्यांचे विविध उपचार पाहू शकता. आणि महत्वाची बाब म्हणजे ते आयुर्वेदििक माहिती पोहोचवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाहीत.त्याचप्रमाणे त्यांची व्याख्याने महाराष्ट्राच्या विविध कानाकोपरा मध्ये होत असतात. लोकांना ज्या ठिकाणी बसायला सुद्धा जागा मिळत नाही.आणि त्यांनी सांगितले इलाजमध्ये तुम्हाला असे आढळून येईल की, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही.
डॉ. स्वागत तोडकर यांची खासियत :-
आणखी एक बाब म्हणजे तुम्हाला हे उपाय घरच्या घरी करता येतील त्या करिता कोणत्याही औषधाची गरज लागणार नाही. आणि लागलीच तर तुम्हाला घरातल्या घरात औषध तयार करू शकाल.या उपचारांमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे उपचार करू शकतात त्यामुळे तुम्हाला जरी सर्दी खोकला ताप या सारखे आजार जरी होत असली तरी त्यावर उपाय मिळेल, त्याचप्रमाणे जर तुम्हाला कॅन्सर मूळव्याध भगेंद्र यासारखे अतिशय विदारक आदर असेल तर त्या आजारांमध्ये देखील तुम्ही मुक्त होऊ शकता फक्त तुम्हाला डॉक्टर स्वागत तोडकर यांनी सांगितलेले विलाज योग्य रीतीने फॉलो करायला पाहिजे.त्याचप्रमाणे या डॉक्टरांचे बोलणे, वागणे अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे. इतर डॉक्टरांनी पेक्षा ते फारच वेगळे आहेत कारण इतर डॉक्टर हे कायम पैशाच्या मागे लागत असतात. मात्र डॉक्टर स्वागत तोडकर हे त्यांच्यापैकी नाही ते फक्त समाज सेवेसाठी कार्यरत असतात. जर तुम्ही एखाद्याला त्याच्या क्लिनिकमध्ये गेला असाल तर तुम्हाला समजेल की त्यांची वर्तणूक कशी आहे.
त्यांच्या मते आपल्या शरीरात जेवढे काही आजार आहेत त्या पैकी जवळपास ९०% आजार हे झोप पूर्ण झाल्यामुळे होत असतात. त्यामुळे लवकर जेवायचं, लवकर झोपायच आणि सकाळी लवकर उठायचे हे त्यांनी सांगितले आहे ज्यामुळे आपले आजार कमी होवू शकतात. त्याचप्रमाणं तुम्ही कायम हसत राहिले पाहिजे. आणि हसल्यामुळे तुमचे खूप आजार कमी होवू शकतात. आणि कधीही कोणावर राग करू नये असेही ते सांगतात.त्यांचा स्वभाव ही तुम्ही पाहू शकता तेथे आपल्याला पाहायला मिळेल की ते नेहमी हसत असतात. कोणत्याही प्रकारचा राग त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसणार नाही. अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळेच त्यांना इतके लोक पसंद करतात व त्यांच्या क्लिनिक मध्ये येतात व आपला उपचार अतिशय चांगल्या पद्धतीने करतात.तुम्हीही तुमच्या काही समस्या असतील तर त्यांच्या क्लिनिक मध्ये जाऊन उपचार करू शकता.जी गोष्ट चांगली आहे त्याविषयी समाजातून अनेक वेळा विरोध होत आहे तसाच विरोध आता पण होत आहे. स्वागत तोडकर यांच्यावर अनेक खाजगी डॉक्टरांनी तक्रार नोंदवली आहे. कारण त्यांचे खाजगी दवाखाने आहेत. आणि जर लोक फुकट मध्ये विलाज करणाऱ्या डॉक्टर कडे गेले तर त्यांचा व्यवसाय उध्वस्त होईल म्हणून अनेक समाजातील डॉक्टर त्यांना विरोध करतात की हे डॉक्टर बोगस आहेत त्यांच्यावर केस पण केली जाते मात्र स्वागत तोडकर त्यांना न जुमानता गेली कित्येक वर्षे आपले काम योग्य रीतीने करत आहेत. त्यांच्यामुळे अनेक रोग्याचे आजार बरे झाले आहेत.
डॉ. स्वागत तोडकर यांचा व्हाट्सअप नंबर :-
088882 83737
डॉ. स्वागत तोडकर यांचे काही घरगुती उपाय:-
त्वचा मऊ ठेवण्याकरिता घरगुती उपाय:-
जर आपल्याला आपली त्वचा कायम मऊ ठेवायची असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा डाळीच्या पिठाने अंघोळ करावी.
सर्दी,खोकला ,ताप न होण्यासाठी घरगुती उपाय:-
१.आयुष्यात कधीपण कोणत्याही प्रकारची सर्दी,खोकला,ताप न होण्यासाठी अंघोळी करताना आपण तोंडामध्ये पाणी धरू शकतो असं केल्यामुळे आपल्याला सर्दी खोकला ताप होणार नाही.
२.त्याचप्रमाणं आपण जर चमचाभर तूप जर कोमट केलं आणि ते दिवसातून थोड्या थोड्या वेळाने खाल्ले तर आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढेल व खोकला सर्दी कमी होवून जाईल.
३. वेखंड आणि जायफळ यांचे मिश्रण करायचे हे मिश्रण उगळतान त्यामध्ये तूप घालावे आणि ते मिश्रण आपल्या कपाळावरती आणि गळ्याच्या वरती लावले तर आपल्याला तर कणकण असेल किंवा सर्दी,खोकला,ताप असेल तर तेही कमी होईल.
४. खायच्या पानामध्ये मध्ये जर जायफळची पूड लावली आणि ते जायफळ जर घशाच्या जागेला लावलं तर आपल्याला खोकला असेल किंवा घशाशी संबंधित कोणताही आजार असेल तर तो कमी होवून जाईल.
घनदाट केस उगवण्यासाठी घरगुती उपाय:-
आपले जर केस गळत असतील किंवा केसांमध्ये कोंडा झाला असेल किंवा विरळ केस असतील तर त्यावेळेला आपण वडाच्या पारंब्या आणून त्या शुद्ध खोबरेल तेलात घालून उकळून घ्यायच्या. त्या नंतर त्या मातीच्या भांड्यामध्ये ८ दिवस झाकून ठेवायचं. व ज्या दिवशी सकाळी तुम्ही केस धुणार आहात त्याच्या अगोदरच्या रात्री केसांना ते तेल लाऊन झोपायच हे सलग आठवड्यातून एकदा असे ३ महिने तरी करावे. त्यामुळे तुमचे गळलेले केस परत येतील,केसातील कोंडा कमी होईल ,केसगळती थांबेल.
रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची घरगुती उपाय:-
आपल्या शरीराची रोग्रतिकारक शक्ती कमी असेल तर आपल्याला कोणताही आजार सहज होवू शकतो किंवा सर्दी, खोकला, ताप यासारखे साधे आजार पण होवू शकतात. त्याच्यामुळे आपले शरीर कमकुवत बनलेले असते. तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आपण गाजर किसून ते तुपात परतून घेवून खाल्ले तर आपली रोगप्रतिकारक शक्त वाढायला मदत मिळते. त्याचप्रमाणे त्याचा उपयोग आपल्या शरीरातील पाणी वाढवायला मदत होईल, पित्त कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होईल, डोळ्यांसाठी त्याचा उपयोग होईल.
आपल्याला हा लेख आवडला असेल तर इतर मित्रांनाही पाठवा. आणि काही माहिती हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका…