नमस्कार मित्रानो, जर तुम्ही व्यंकटेश देवाची आरती शोधत असाल तर या वेबसाईट वरती तुम्हाला आरती मिळेल. आणि खालती दिलेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही चाल देखील पाहू शकता.
श्री व्यंकटेश आरती Lyrics in Marathi
शेषाचल अवतार तारक तूं देवा l
सुरवर मुनिवर भावें करिती जन सेवा ll
कमलारमणा अससी अगणित गुण ठेवा l
कमलाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ll १ ll
जय देव जय देव जय व्यंकटेशा l
केवळ करूणासिंधु पुरविसी आशा ll धृ. ll
हे निजवैकुंठ म्हणुनी ध्यातों मी तू तें l
दाखविसी गुण कैसे सकळिक लोकाते ll
देखुनि तुझे स्वरूप सुख अद्भुत होते l
ध्यातां तुजला श्रीपति दृढ मानस होते ll