गणपती भूपाळी | Ganpati Bhupali Lyrics

नमस्कार मित्रानो, जर तुम्ही गणपतीची भूपाळी शोधत असाल तर तुम्हाला या पोस्ट मध्ये माहिती मिळेल.

उठा उठा हो सक सकळीक
वाचे स्मरावा गजमुख ।
ऋध्दीसिध्दिंचा नायक |
सुखदायक भक्तांसी ।
सुखदायक दासांसी ।। ध्रु ।।

अंगी शेंदुराची उटी ।
माथां शोभतसे किरीटी ।
केशर कस्तूरी लल्लाटी ।
हार कंठी साजिरा ।। १ ।।

कानी कुंडलाची प्रभा ।
चंद्रसूर्य जैसे नभा ।
माजी नागबंद शोभा ।
स्मरता उभा जवळी तो ।। २ ।।

कांसे पिताम्बराची घटी
हाती मोदकाची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी
तो संकटी पावतो ।। ३ ।।

गणेश द्वितीय भूपाळी | Ganeah Dwitiya Bhupali

उठा उठा हो सकल जन ।
वाचे स्मरावा गजानन ।
गौरी हराचा नंदन ।
गजवदन गणपति ।। ध्रु ।।

ध्यानी आणुनी सुखमुर्ती ।
स्तवन करा एके चित्ती ।
तो देइल ध्यान मूर्ति ।
मोक्ष सुख सोज्वळ ।। १ ।।

जो निज भक्तांचा दाता ।
वंद्य सुरवरा समर्था ।
त्यासी गातां भवभय चिंता ।
विघ्नवार्ता निवारी ।। २ ।।

तो हा सुखाचा सागर ।
श्री गजानन मोरेश्वर ।
भावे विनवितो गिरिधर ।
भक्त त्याचा होउनी ।। ३ ।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *