पिंपरी : पिंपरी येथील महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्तांची दिव्याची गाडी आली. गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून महापालिका शाळेतील दोन विद्यार्थी उतरले. त्यांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीत प्रवेश केला. मुख्य प्रवेशद्वार तसेच आयुक्त कार्यालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सॅल्युट केले. हे दृश्य होते आज महापालिका आयुक्तांची भूमिका बजावणाऱ्या दोनशालेय विद्यार्थ्यांच्या स्वागताचं. आज एक अनोखा प्रेरणादायी उपक्रम शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आज एक अनोखा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. महापालिकेच्या भोसरीयेथील इंद्रायणी नगर प्राथमिक शाळेतील इयत्ता ७ वी मधील विद्यार्थी करण काकडे आणि काळेवाडी येथील दत्तोबा रामचंद्र काळेशाळेतील इयत्ता सातवीची विद्यार्थीनी अपेक्षा माळी या दोघांनी महापालिका आयुक्तांची भूमिका केली. यावेळी त्यांनी विभागप्रमुखांचीआढावा बैठक देखील घेऊन सूचना केल्या. बैठकीस सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारीसंजय नाईकडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिकतसेच विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते. अग्निशमन विभागाची जनतेला कशी मदत यानंतर दोन्ही विद्यार्थी आयुक्तांनी संत तुकारामनगर येथील अग्निशमन केंद्राला भेट देऊन तेथील कामकाज कसे चालते, अग्निशमन विभागाची जनतेला कशी मदत मिळते याबाबत प्रात्याक्षिक पाहिले, तसेच तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. एकीकडे विद्यार्थ्यांनी महापालिका आयुक्त म्हणून भूमिका केली तर दुसरीकडे आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या शाळांमध्येजावून शिक्षकाची भूमिका पार पाडली. आयुक्त शेखर सिंह या अनुभवाबाबत बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘जॉब स्विच’ या उपक्रमांतर्गत मी आज एका शिक्षकाची भूमिका पार […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More