विंग तालुका खंडाळा येथील आंतरराष्ट्रीय कंपनीचे फ्रिज वॉशिंग मशीन, असे साहित्य कर्नाटक राज्यातील विजापूर येथील लमान तांड्यावर परस्पर विकणाऱ्या कंटेनर चालकाला शिरवळ पोलिसांनी वेशांतर करून अटक केली आहे. अशोक वेणू चव्हाण (वय ४१), राहणार बेगम तालाव, तांडा, जलनगर तालुका जिल्हा विजापूर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून कंटेनरसह ५८ फ्रिज व ५६ वॉशिंग मशीन असा १४ लाख ४५ हजार १५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More