पिंपरी : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस सारथी संस्थेच्या महिला अध्यक्षापदी पिंपरी-चिंचवडच्या हिना मुलाणी यांची निवड करण्यात आली आहे. पोलीस सारथी सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शहाजी अंकुशराव भोसले यांनी या निवडीबाबतचे पत्रदिले आहे. पोलीस सारथी सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शहाजी अंकुशराव भोसले, उपाध्यक्ष सुरज कोळी, सचिव अजितदुबे, महासचिव अशोक उंडे, सहसचिव बिरजू जाधव, कार्याध्यक्ष नीरज साळुंखे, संपर्क प्रमुख अरविंद वाघ , युवक अध्यक्ष शुभम ससे, संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख ओंकार दाते आदी या वेळी उपस्थित होते. हिना मुलाणी या गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांचे सामाजिक,शेक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रातसामाजिक उपक्रम राबिवले आहेत. यांच्या या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातून आणि परिसरातील सर्व स्तरातून अभिनंदन केलेजात आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More