पिंपरी : विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण पध्दतींसोबतच पारंपारिक शिक्षणाची सांगड घालावी, जेणेकरून उज्वल भविष्याची स्वप्नेपाहणा-या आणि ती साकार करण्यासाठीचा मार्ग अधिक सुखकर होईल, असे मत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंहयांनी व्यक्त केले. आज, दि. २८ रोजी आयुक्त सिंह यांनी चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या “पुनरुत्थान समरसतागुरुकुलम” संस्थेला भेट दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचेअध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, गुरुकुलमच्या मुख्याध्यापिका पूनम गुजर यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होते. स्टीम लर्निंग विभागांतर्गत थींगकींग स्पर्धेत प्रसंगी, आयुक्त सिंग यांनी प्रयोग शाळेची पाहणी केली. अभियांत्रिकी विभागात बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, नारळाच्या कवटीपासून बनलेल्या कलाकृती, शाडूमातीपासून तयार केलेले गणपती व त्यांच्यापासून पर्यावरणाला होणारे फायदे याबाबत माहितीजाणून घेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. माती परिक्षणातून पिकांसाठी आवश्यक असलेली माती, झाडांच्या वाढीसाठी लागणारे गुणसत्व यबाबत मुलांनी विविध प्रयोगांद्वारे माहिती दिली. चांद्रयान ३ मोहिमेसंदर्भात प्रश्नांची विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. दरम्यान, स्टीम लर्निंग विभागांतर्गत थींगकींग स्पर्धेत निवड झालेल्या गणेश कामठे, सूजन बनसोडे या विद्यार्थ्यांचे आयुक्त सिंग […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More