अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातला अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे अनेक महिला प्रसुतीसाठी दाखल होतात. मागील 4 तासांपासून अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील वीज पुरवठा बंद असल्याने रुग्ण अक्षरशः वैतागले होते. गरमी आणि महत्त्वाच्या शस्त्रक्रिया थांबल्याने हा प्रकार जीवावर बेतण्यासारखा होता. प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. अनेक नवजात बालकांचा या रुग्णालयात जन्म होतो. पण या गोष्टीचं गांभीर्य रुग्णालय प्रशासनाला नाही, असं स्पष्टपणे उघड झाले आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More